आर्किमेडीज मराठी माहिती
प्राचिन काळातील प्रख्यात विद्वान शास्त्रज्ञापैंकी आर्किमेडीज हा एक मानला जातो. भौतिकशास्त्रामध्ये, तरफेच्या तीन प्रकारांचे स्पष्टीकरण देऊन जलदाबाच्या मूलभूत तत्त्वांचा संशोधन करुन अभ्यास केला. आर्किमेडीजच्या जलदाबाच्या तत्त्वांपासून प्रेरित होऊन ई.स. 1556 साली गॅलिलिओने जलदाबदर्शक तराजू बनवला. आर्किमेडीज हा थोर गणितज्ञ मानला जातो. पॅराबोलाच्या कंसाचे क्षेत्राफळ त्यांनी मोजले व त्यांनी ‘पाय’ ची अंदाजे किंमत ठरवली.
Table of Contents
आर्किमेडीज प्रसिद्ध तत्त्व :
घन पदार्थ द्रवात बुडवला असता, घनपदार्थाने सारलेले द्रवाचे आकारमान हे घनपदार्थाच्या वजनाएवढे असते. ( हे तत्त्व आर्किडमेडीजला आंघोळीला बाथ टब मध्ये बसताना टबमधून पाणी सांडताना पाहून सुचले.)
दंडगोलाचे पृष्ठफळ (पायाच्या पृष्ठफळासह) आणि घनफळ हे गोळ्याच्या घनफळ व पृष्ठफळाच्या 2/3 असते असे आर्किमेडीजने सिद्ध केले. युक्लिड व आर्किमेडीज यांची लिखित कार्ये आज अस्तित्वात नाहीत. आर्किमेडीजचे कार्य अरबी भाषेत भाषांतरीत केले गेले होते. त्या काळच्या रोमन राजाच्या आज्ञेनूसार आर्किमेडीज याला पकडायला आलेल्या रोमन सैनिकाने त्यांना पकडण्याऐवजी मारले.
मायकेल फॅरेडे मराठी माहिती
संशोधन व त्याचे मानवजातीसाठी झालेले फायदे
विद्युत विघटनाचे (इलेक्ट्रॉलायसीसचे) नियम इलेक्ट्रॉलायसीसची घटना व त्यातील सत्य समजावे यासाठी त्यांनी सहज नियम बनवले. फॅरेडे यांचे विद्युत रसायनशास्त्रातील दोन नियम याप्रमाणेः
1) इलेक्ट्रॉसेलच्या (विद्युत अपघटकीय घट) प्रत्येक इलेक्ट्रॉडवर जमलेल्या पदार्थाचे प्रमाण, घटातून जाणाऱ्या विजेच्या प्रमाणाच्या प्रत्यक्षात समान असते.
2)विजेच्या निश्चित प्रमाणाद्वारा जमा होणाऱ्या कणांची संख्या त्यांच्या रासायनिक वजनाच्या प्रमाणात असते
इ.स.1825 मध्ये फॅरेडे यांनी बेन्झिनचा शोध लावला. त्यांनी विद्युत विघटनावर आधारित वेगवेगळे प्रयोग केले व विघटीत पदार्थातील तत्वांचे पृथक्करणही केले. या आधारे त्यांनी विद्युत एककाची ही व्याख्या केली “सिल्व्हर नायट्रेटच्या विद्युत विघटनातून (इलेक्ट्रॉलाइज)” 0.001118 ग्रॅम चांदी प्राप्त करण्यासाठी जो विद्युप्रवाह लागतो, त्यास एक “ॲम्पियर ” म्हणतात.
विद्युत व चुम्बकत्वाच्या (मेग्रेटीझम) संबंधातील त्यांच्या प्रयोगाच्या आधारे विजेच्या मोटारचा शोध लागला.त्यांनी स्पष्ट केले की, चुंबकीय व विद्युत क्षेत्रात सापेक्ष गती उत्पन्न करुन चुंबकीय क्षेत्राला (मॅग्रेटिक फिल्ड) विजेच्या उर्जेत (इलेक्ट्रॉक एनर्जी) रुपांतरीत करता येऊ शकते. यांनी विद्युत जनित्राचा (इलेक्ट्रॉक जनरेटर) जो आराखडा बनवला. तो आजच्या विशाल आकाराच्या डायनॅमोचे मूळ रूप आहे.
फॅरेडे यांना विद्युत मोटार व जनित्र यांचे संशोधक मानले जाते. धारण क्षमतेच्या (कॅपॅसिटन्स) युनिटला फॅरेडे यांच्या सन्मानार्थ ‘फॅरॅड’ असे नाव देण्यात आले आहे. त्यांनी विद्यापीठीय महाविद्यालयात प्राध्यापकपद स्वीकारण्यास नकार दिला, इतकेच नव्हे तर, सरकारकडून ‘सर” उपाधीसाठी प्रस्तावित ‘नाईटहूड’ पुरस्कार देखील नाकारला.
रॉयल सोसायटीच्या अध्यक्षपदासाठी त्यांना दोनदा प्रस्ताव दिला गेला. पण यासाठी देखील त्यांनी आपली असमर्थता व्यक्त केली. त्यांचा मृत्यू दि. २६ ऑगस्ट १८६७ रोजी झाला.
अर्नेस्ट रुदरफोर्ड मराठी माहिती
किरणोत्सारक अणुरचना (१८७१-१९३८)
अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी वारंवार उलटसुलट दिशा व मूल्य बदलणाऱ्या आणि दर सेकंदाला होणाऱ्या आवर्तनाची संख्या उच्च असलेल्या चुंबकीय क्षेत्राबद्दल त्यांनी इथेच वर्षभर संशोधन केले आणि त्यामुळे त्यांना इंग्लंडमध्ये केंब्रिज विद्यापीठात प्रवेश व शिष्यवृत्ती मिळाली.
1896 साली जे. जे. टॉमसन या प्रसिद्ध वैज्ञानिकाबरोबर रुदरफोर्ड यांना काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी सन 1898 साली ‘अल्फा किरण’ व ‘बीटा किरण’ यांचा शोध लावला. पुढे काही दिवसात ‘गॅमा किरण’ याचा शोध लावला. 1908 साली रुदरफोर्डने मूलद्रव्याचे विघटन व किरणोत्सर्गी द्रव्याचे रसायनशास्त्र या विषयी केलेल्या संशोधनाबद्दल रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषीक मिळाले. तसेच 1919 साली ‘अणुकेंद्राचे कृत्रिम विघटन’ हा तिसरा व अत्यंत महत्वाचा शोध रुदरफोर्डनी केव्हेंडिश लॅबोरेटरीच्या संचालकपदी असताना लावला. रॉयल सोसायटीने त्यांना ‘कॉप्ले’ पदक दिले. ‘रेडिओ ऍक्टिव्हिटी’ या त्यांच्या पुस्तकाने अणुसंशोधन शास्त्राचा पायाच घातला. पुढे-पुढे त्यांना अनेक सन्मान, पदव्या व पारितोषिके मिळाली. नायट्रोजनच्या अणुभंगातून निष्पन्न झालेल्या हायड्रोजनच्या अणुला ‘प्रोटॉन’ हे नाव रुदरफोर्डनीच दिले..
1921-24 या सुमारास चॅडविक यांच्याबरोबर संशोधन करुन त्यांनी बोरॉन, फ्लुओरिन, अँल्युमिनिअम व फॉस्फरस यांचे मूलद्रव्यांतरण करण्यात यश मिळवले. 19 ऑक्टोबर 1937 साली या महान वैज्ञानिक रुदरफोर्डचा केंब्रिज येथे मृत्यू झाला. त्यांना किरणोत्सारक अणुसंरचनेचे भिष्माचार्य मानतात.
एडवर्ड जेन्नर मराठी माहिती
संशोधन व त्याचे मानवजातीसाठी झालेले फायदे
जेन्नर यांचे कार्यक्षेत्र ग्रामीण भागात होते. त्यांचे बहुतेक रुग्ण कृषी क्षेत्रातील होते आणि त्यांच्याकडे गायी आणि बैल मोठया प्रमाणात होते. 1788 मध्ये देवीचा रोग इंग्लडमध्ये मोठ्या प्रमाणात पसरला. त्यावेळी जेन्नर च्या खेड्यातीलअनेक लोकांनी आश्चर्यकारकपणे साथीच्या आजारापासून स्वतःला बचावले होते.
ग्लॉसेस्टरशायरच्या ग्रामीण जनतेला हे माहीत होते की, काऊपॉक्स झालेल्या रोग्याला देवीचा रोग होत नाही. हा रोग प्रथम गायींवर आक्रमण करतो, त्यामुळे त्याला ‘काऊपॉक्स’ म्हणतात. गायीमुळे हा रोग माणसांना होतो. मग या रोगाबाबत असा प्रश्न निर्माण होतो की, याची लागण फक्त गाईंनाच का होते ? घोड़े व अन्य पशूंना का होत नाही ? हंटर यानी प्रोत्साहित केल्यामुळे जेन्नर यानी आपले संशोधन काऊपॉक्सवर केंद्रित केले. डॉ. जेन्नर यांनी जेम्स फिक्स नावाच्या 8 वर्षाच्या मुलावर निरिक्षण आणि कल्पनेच्या मदतीने 1796 मध्ये प्रयोग सुरु केले.
हातावर दोन बारीक जखमा झाल्या आणी गायीच्या चिकनपॉक्सच्या पुरळांच्या स्त्रावासह ते मिसळले.त्यानंतर मुलाला थोडा ताप आला परंतु काही दिवसानंतर तो पूर्णपणे बरा झाला.काही आवड्यानंतर मुलाला पुन्हा एकदा देवीच्या पुरळ आले. त्यानंतर जेन्नर यांनी देवीच्या फोडातून काढलेल्या लसिकेचे इंजेक्शन त्याला दिले. परंतु नंतर त्या मुलाला देवीचा आजार झाला नाही, तेव्हा जेन्नर यांनी आपले निष्कर्ष घोषीत केले तेव्हा समाजात खळबळ माजली. वातावरण निवळले, तेव्हा जेन्नर यांनी आपल्या संशोधनाचा विस्तृत अहवाल जाहीर करून जगासमोर देवीची लस (व्हॅक्सीन) सादर केली. त्यांच्या लसीमुळेच आज देवीमुक्त समाज अस्तित्वात आला आहे.
जेन्नर 1802 मध्ये अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्टस् अँड सायन्सच्या परदेशी सन्मान सदस्य 1804 मध्ये अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटीचा सदस्य आणि रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसचा परदेशी सदस्य म्हणून निवडले गेले. जेन्नर त्यांच्या त्या लसीसाठी सर्व जग त्याचे आभारी राहील. त्याचा मृत्यू दि 25 जानेवारी 1823 रोजी झाला.
हेन्री कॅव्हेंडिश
संशोधन आणि त्याचे मानवजातीसाठी फायदे
हायड्रोजन वायू हवेत जळतो तेव्हा दव म्हणजेच पाण्याचे थेंब तयार होतात हे कॅव्हेंडिशने सिद्ध केले. त्याने 1785 मध्ये शोधून काढले की पाणी आणि ऑक्सिजनमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये इलेक्ट्रिक स्पार्क गेल्याने नायट्रिक ऍसिड तयार होते. हा शोध औद्योगिकदृष्ट्या उपयुक्त ठरला.
रसायनशास्त्रातील त्यांच्या कार्याबरोबरच त्यांना “पृथ्वीची घनता शोधणारे पहिले वैज्ञानिक” म्हणूनही ओळखले जाते. पृथ्वीचे वजन आणि ‘गुरुत्वाकर्षण स्थिरांक’ यांचे अचूक गुणोत्तर शोधण्यासाठी त्यांचे कार्य नंतर वापरले गेले. 1784 मध्ये, कॅव्हेंडिशने घोषित केले की हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या संयोगाने पाणी तयार होते. आपण श्वास घेत असलेल्या वायूमध्ये 20 टक्के ऑक्सिजन असतो, असेही त्यांनी सांगितले. जेव्हा वातावरणात ठिणगी पडते तेव्हा त्यात ऑक्सिजन आणि नायट्रोजनचे मिश्रण असते असा निष्कर्षही त्यांनी काढला.
ध्रुवीय प्रकाश, भूगर्भशास्त्र, विद्युत अशा विविध विषयांत त्यांनी संशोधन केले. प्रयोगांची अचूकता ही त्यांची खासियत होती. त्यांनी संशोधन केले की साखरेच्या किण्वनाचे उप-उत्पादन (कार्बन डायऑक्साइड वायू) उलट करता येण्यासारखे आहे. ही प्रक्रिया कठोर पाण्याच्या कारणांपैकी एक आहे. कॅल्शियम हायड्रॉक्साईड वापरून कठोर पाणी मऊ केले जाऊ शकते. असे संशोधन त्यांनी केले. त्यांचा मृत्यू दि. दिनांक 24 फेब्रुवारी 1810.
अशाप्रकारे आपण काही निवडक शास्त्रज्ञांची माहिती पहिली ही माहिती आमच्या वाचनातून तसेच काही वर्तमानपत्रातील लेखातील असून यामध्ये काही बदल वाटल्यास आम्हांला नक्की सुचवा. आम्ही तो बदल नक्की नोंद करू काही शंका असल्यास comment करा.
धन्यवाद.
This article On Zpshikshak Site was written by Mustapha Shaikh. He is a famous YouTuber and Blogger. He has experience in SEO, web development, and writing SEO content.