प्रकल्प यादी मराठी मधील Prakalp म्हणजे शालेय विषयांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाशी संबंधित विषय निवडून सोबतची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी त्यांचे वय, समज, हवामान यानुसार आणि आजूबाजूचा परिसर यात उपलब्ध होणारे साहित्य एकत्रित मांडणी करून विद्यार्थ्यांनी केलेली कृती होय.
☀ प्रकल्प उद्दिष्टे
1) विद्यार्थ्यांना स्वयंअध्यनाची सवय लागते
2) विद्यार्थ्यांना तर्कसंगत विचार करण्याची सवय लागते.
3) आत्मविश्वास वाढीस लागतो
4) कृती स्वतः केल्यामुळे अध्ययन होते व लक्षात राहते
5) सृजनशीलतेचा विकास होतो.
6) निवडलेल्या विषयाची सखोल माहिती होणे
इयत्ता 1 ली ते 8 वी साठी विषय निहाय प्रकल्प यादी
☀ विषय भाषा
- परिसरातील पक्षी व प्राण्यांची नावे लिहिणे
- कथांचा संग्रह करणे
- कवितेचा संग्रह करणे
- वृत्तपत्रातील कात्रण एकत्रित करणे
- जोडशब्द वाचन करणे
- रोज एक उताऱ्याचे वाचन करणे
- बडबडगीते तोंडपाठ करणे
- कविता गायन करणे
- परिसरातील स्थळांची माहिती एकत्रित करणे
- चित्रे ओळखता येणे
- चित्रावर आधारित गोष्ट तयार करणे
- सहलीचे वर्णन करणे
- प्रसंग व घटना यांचे वर्णन करणे
- भाषिक खेळ तसेच शब्द कोडी तयार करणे
- देशभक्तीपर गीतांचा संग्रह करणे
- प्रार्थना संग्रह करणे
- भावगीतांचा संग्रह करणे
- गावातील निवडक व्यक्ती तसेच कर्मचारी यांच्या मुलाखती घेणे
- अवांतर वाचन करणे
- समानार्थी शब्द संग्रह करणे
- विरुद्धार्थी शब्द संग्रह करणे
- औषधी वनस्पतीच्या नावाचा संग्रह करणे
- औषधी वनस्पतीच्या चित्रांचा संग्रह करून माहिती गोळा करणे
- प्रत्येक व्यवसायाशी निगडीत माहिती गोळा करणे
- सणाचे महत्व विशद करणे
- म्हणी तसेच वाक्यप्रचार संग्रह करणे व पाठ करणे
☀ विषय गणित
- नाणी व नोटांचा संग्रह
- आईस्क्रीमच्या काड्या पासून भौमितिक आकृत्या तयार करणे
- घड्याळाच्या प्रतिकृती तयार करणे
- गणिती सूत्रांचा संग्रह करणे
- व्याख्या एकत्रित करून संग्रह करणे
- सम संख्या विषम संख्या यांचा संग्रह करणे
- वर्ग आणि वर्गमूळ संख्याचा संग्रह करणे
- दशक, शतक हजार अशा प्रकारच्या संख्या एकत्रित लिहिणे
- दुकानाच्या बिलांचा संग्रह करणे
- प्रत्यक्ष व्यवहार करण्याचा प्रयत्न करणे
☀ विषय सामान्य विज्ञान
- विविध शास्त्रज्ञाची माहिती संग्रहित करणे
- सजीव निर्जीव यांची चित्रासह माहिती एकत्रित करणे
- आपल्या अवयव व त्यांचा उपयोग संदर्भात माहिती जमा करणे
- पाण्यात विरघळणारे व न विरघळणारे पदार्थ यादी करणे
- छोटे छोटे प्रयोग करणे
- खाण्याचे पदार्थ व चव याविषयी यादी तयार करणे
- वेगवेगळ्या द्रव पदार्थांची माहिती एकत्रित करणे
- मऊ व स्फटिक पदार्थ यांची यादी करणे
- पदार्थांच्या अवस्थांनुसार यादी तयार करणे
- प्रदूषण व प्रकार यांची माहिती गोळा करणे
- आपले ज्ञानेंद्रिय व त्यांची माहिती एकत्रीत करणे
- पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राणी यादी करणे
- सजीव व निर्जीव यादी तयार करणे
- चांगल्या सवयीची यादी व अंगीकार करणे
- पाळीव व जंगली प्राणी यांची यादी करणे
- शाळेतील चांगल्या सवयीची यादी करणे
- शेतीतील औजारे व त्यांची माहिती संग्रहित करणे
- वेगवेगळ्या ऊर्जा स्त्रोतांची माहिती जमा करणे
☀ विषय इतिहास नागरिक शास्त्र
- ऐतिहासिक घटनांची यादी करणे
- गड व किल्ल्यांची चित्रासहित माहिती संग्रह करणे
- राजमुद्रा व ध्वजांच्या चित्रांचा संग्रह करणे
- नागरिकांचे हक्क व कर्तव्ये यांची यादी तयार करणे
- समाज सुधारकांचे कार्ये विशद करता येणे
- राज्यानुसार देशात बोलल्याजाणाऱ्या भाषाची यादी तयार करणे
- दळण वळणाची साधने यांची यादी तयार करणे
- अशमयुगीन हत्यारे व त्यांची माहिती चित्रांसहित संग्रहित करणे
- संतांची माहिती चित्रासहित संग्रहित करणे
- ग्रामपंचायत कार्यालय तसेच पंचायत समिती कार्यालय ला भेट देऊन माहिती जमा करणे
- आपले अधिकारी व पदाधिकारी यांची यादी तयार करणे
- ग्रामपंचातीच्या कामाची यादी तयार करा
☀ विषय भूगोल
- विविध खडकांचे नमुने गोळा करा
- विविध धान्यांचा संग्रह करा
- डाळीचा संग्रह करा
- कडधान्यांचा संग्रह करा
- देशाचे नकाशे संग्रहित करा
- प्रदूषण व करणे यांची यादी करा
- बाजारात भेट देऊन वस्तूंची यादी तयार करा
- ऋतू नुसार पिकांची यादी तयार करा
- धरणाला भेट देऊन माहिती गोळा करा
- शेतीच्या विविध कामाची माहिती एकत्रित करा
- नद्यांच्या नावाची यादी तयार करा
- आपल्या जिल्ह्याची माहिती तयार करा
- परिसर भेट आयोजित करा
☀ प्रकल्प लेखन कसे करावे
प्रकल्प लेखन करताना खालील बाबीचा काळजीपूर्वक विचार करून प्रकल्प लेखन करावे.
* प्रथम विषय व नंतर प्रकल्पाचा विषय लिहावा
*प्रकारानुसार प्रकल्पाची मांडणी करावयाची असल्याने प्रकल्पाचा प्रकार नमूद करा.
* प्रकल्पाची उद्दिष्टे योग्य प्रकारे स्पष्ट करा.
* विषयानुरूप प्रकल्पाचे साहित्य उपलब्धतेनुसार वापरावे व त्याचा उल्लेख करावा.
* प्रकल्पाची कार्यवाही सुरुवाती पासून शेवट पर्यंत वर्णन करावी.
* प्रकल्प करताना प्रकल्पच हेतू स्पष्ट करावा
* योग्य त्या ठिकाणी नकाशे, चित्रे यांचा वापर करा व चिटकवा
* शेवटी मूल्यमापन मध्ये तुमच्या प्रकल्पामधून कोणकोणती उद्दिष्टे साध्य झाली तसेच हेतू स्पष्ट झाले
याचा उल्लेख असतो.
अशाप्रकारे आज आपण प्रकल्प व प्रकल्प लेखन व त्याची उद्दिष्टे याविषयी सखोल माहिती अभ्यासली हि माहिती कशी वाटली ते नक्की कळवा.
हे देखील वाचा :
अधिक नवीन माहिती साठी आमच्या Telegram
ग्रूप ला Join व्हा.
Telegram 👇👇👇
This article On Zpshikshak Site was written by Mustapha Shaikh. He is a famous YouTuber and Blogger. He has experience in SEO, web development, and writing SEO content.
Table of Contents