New Education Policy 2023 | मुलांसाठी नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार !

New Education Policy 2023नवीन शैक्षणिक धोरण (NEP) 2020 ची अंमलबजावणी सुरू होणार असल्याची माहिती  मा. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली, या जून पासून  सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षात शैक्षणिक आराखडा  5+3+3+4 असणार आहे असे त्यानी नमूद केले. यांविषयी सविस्तर माहीती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.New Education Policy 2023 मुलांसाठी नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार

नवीन शैक्षणिक धोरण स्वरूप आणि अभ्यासक्रम 

अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करून आनंददायी व मनोरंजक खेळ, कृती व शोध आधारित अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे संबोध, आकलन, उपयोजन यांवर आधारित गणिती दृष्टिकोन, वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशील विचार, चिंतनशिल विचार, सहसंबंधात्मक अध्ययन, संवाद कोशल्यावर आधारित अभ्यासक्रम तयार केला जाणार असल्याचे समजते. पाठांतरांवर आधारित परीक्षा पद्धती समपुष्टात येऊन कौशल्यावर व क्षमता विकासावर जास्तीचा भर असणारआहे. अध्ययन निष्पत्ती वर विद्यार्थ्यांचे मूल्यांकन होणार आहे. केवळ गुण न नोंदविता क्षमता / कोशल्य विकसनाची स्थिती प्रगती पुस्तकात नोंदवून सर्वांगीण विकासाच्या प्रक्रियेला गती  दिली जाणार आहे.
त्याचप्रमाणे बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम निर्माण केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र असणार आहे. 10 व 12 वी बोर्डाच्या परिक्षेचे महत्त्व कमी होणार आहे.

नवीन शैक्षणिक धोरणातील काही महत्त्वाचे बदल

  • नवीन शैक्षणिक धोरणातील बदलांनुसार 10 वी व 12 वी  परीक्षांचे महत्त्व  पूर्वीसारखे असणार नाही.
  • New Education Policy नुसार  आराखडा 10+2+3  ऐवजी  5+3+3+4 असणार आहे.
  • नवीन शैक्षणिक धोरणानुसार सेमिस्टर पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे.परीक्षा दर सहामाही ला असणार आहे.
  • 5+3+3+4  यामध्ये  सुरुवातीचे  5 = पूर्व प्राथमिक +पहिली इयत्ता +दुसरी इयत्ता, 3 = इयत्ता तिसरी ते पाचवी  चा समावेश  असणार आहे, तसेच 3 = इयत्ता सहावी ते आठवी  चा समावेश  असणार आहे. 4  = यांमध्ये नववी ते बारावी च्या वर्गाचा समावेश आहे .
  • इयत्ता पाचवी  पर्यंतचे शिक्षण त्या त्या प्रदेशानुसार प्रादेशिक भाषेत तसेच मातृभाषेत घेता येणार आहे.
  • पूर्व प्राथमिक शाळेसाठी अभ्यासक्रम NCERT ठरवणार आहे.जो सर्व देशासाठी लागू असेल.
  •  नवीन शैक्षणिक धोरणांनुसार मुलांच्या प्रगती पुस्तकात  ग्रेड सोबतच शिक्षकांच्या शेरे चा समावेश असणार आहे. सोबतच आपला पाल्य extra-curricular Activity मध्ये कसा आहे याची माहिती होणार असल्याने पालक जागृती व विद्यार्थी सुधारणेला वाव असणार आहे.
  • नववी ते बारावी या वर्गाच्या दरम्यान विषय निवडीचे स्वतंत्र आहे.
  • सहावीच्या वर्गापासूनच व्यावसायिक शिक्षण दिले जाणार.
  • पदवी अभ्रासक्रमाचा कालावधी तीन ते चार वर्षांचा असणार, ज्यांना पदवीनंतर लगेच नोकरी हवी आहे त्यांच्यासाठी तीन तर संशोधनासाठी उच्च शिक्षण घ्यावयाचे आहे त्यांना चार वर्ष असेल.
  • खाजगी व सरकारी शिक्षणात समानता.

नवीन शैक्षणिक धोरण मूल्यांकन 

मूल्यांकन हे बहु मुखी असल्या कारणाने  विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनांमधील गुणांचे महत्त्व कमी करून बहुमुखी  मूल्यांकनाची संकल्पनेचा स्वीकार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये केला आहे . ज्यामध्ये  स्वमूल्यांकन, सहाध्यायी मूल्यांकन गटचर्चा  सोबतच विद्यार्थ्यांचे भावनिक , सामाजिक, बोधात्मक तसेच क्रियात्मक प्रगतीच्या आधारे सातत्यपूर्ण मूल्यांकन करण्यात येणार आहे.
हे देखील वाचा :

शिक्षक प्रशिक्षण

विद्यार्थी गुणवत्ता विकास सोबतच शिक्षकांच्या ज्ञानात अधिक भर पडावी तसेच नवीन शैक्षणिक धोरणातील अपेक्षेप्रमाणे शिक्षक समृद्धी साठी शिक्षक प्रशिक्षणाची आवश्यकता आहे.

पहिल्या टप्प्यातील अभ्यासक्रम 

शिक्षणातील पहिल्या टप्प्यातील 5 वर्षांमध्ये अंगणवाडी 3 वर्ष असणार आहे .यामध्ये खेळ शोध व कृती वर आधारित अभ्यासक्रम असेल.
इयत्ता 2 री च्या शेवटी  त्याला समजपुर्वक वाचन व लेखन करण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रमाची संरचना करण्यात येणार आहे.

दुसऱ्या टप्प्यातील अभ्यासक्रम 

दुसऱ्या टप्प्यातील अभ्रासक्रमामध्ये खेळ व कृती तसेच बौद्धिक विकास कसा होईल यावर अभ्यासक्रम असणार आहे.

तिसऱ्या टप्प्यातील अभ्यासक्रम 

या टप्प्यामध्ये इयत्ता सहावी ते नववी च्या विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक व हस्तकला व कौशल्या विकास करण्याच्या दृष्टीने शिक्षण दिले जाणार आहे.

चौथ्या टप्प्यातील अभ्रासक्रम 

शेवटच्या  व अंतिम टप्प्यात इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा अमावेश होतो. यांना वेगवेगळ्या चाळीस विषयांचा अभ्यास करण्याची संधी प्राप्त होणार आहे. विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य असणार आहे. विज्ञान वाणिज्य तसेच कला शाखांमध्ये आपल्या सोईनुसार विषय निवडता येणार आहेत.
अश्याप्रकारे आज आपण New Education Policy 2023 या विषयांवर सविस्तर माहिती पहिली  या माहिती बद्दल काही शंका असल्यास आम्हांला कळवा, आम्ही आपल्या सूचनेचा विचार करून बदल अवश्य करू.
माहिती आवडल्यास comment and Share नक्की करा.
आम्हाला  Follow  करा.  👇👇👇👇
 
Telegram          : https://t.me/+H9CutnnkwVswNzk1
 
हे देखील वाचा :
अधिक नवीन माहिती साठी आमच्या Telegram
ग्रूप ला Join व्हा.
Telegram 👇👇👇
Scroll to Top