2004 मध्ये वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी कुस्तीचा श्री गणेशा केला. परंतु मुलींनी कुस्ती शिकणे ही बाब कुटुंबाला न पटणारी होती. मुलींनी कुस्ती खेळणे हे तेवढे समाजमान्य नव्हते. त्यामुळे साक्षी यांना आपले करिअर घडवताना असंख्य अडचणीचा सामना करावा लागला कालांतराने विरोध मावळला त्यांनी ‘ईश्वर दहिया’ यांच्याकडून कुस्तीचे डावपेच शिकण्यास सुरुवात केली. त्यावेळी प्रतिस्पर्धी म्हणून मुली नसल्याने मुलासोबत कुस्ती खेळावी लागली.
कुस्ती मधील आपली कामगिरी अधिक प्रभावीपणे करत 2010 साली ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत साक्षी यांनी आपल्या कारकिर्दीतलं पहिलं पदक जिंकलं आणि तेथून पुढे यशाचा मार्ग खुला झाला. पाच-सहा वर्षाच्या कालावधीमध्ये साक्षी यांनी असंख्य पदके जिंकली. परंतु ऑलम्पिक स्पर्धेत सहभाग नोंदवून पदक जिंकण्याची सर्वच खेळाडूंची मनोमन इच्छा असते ती इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. जिद्द व चिकाटीच्या जोरावर 2016 च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्यांची निवड झाली. ऑलिंपिक स्पर्धेमध्ये निवड झाल्याने साक्षी यांची जबाबदारी अधिक वाढली.
साक्षी यांना ऑलम्पिक स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली आणि या संधीचं सोनं करण्याचं त्यांनी ठरवलं. अंतिम सामना सुरू झाला सामन्यामध्ये सुरुवातीला 0-5 ने त्या पिछाडीवर पडल्या. साक्षी हा सामना हरणार असं प्रत्येकाला वाटायला लागलं. परंतु अद्याप साक्षी यांनी माघार घेतलेली नव्हती. आपण अद्यापही जिंकू शकतो असा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये होता. शेवटचे सहा मिनिटे उरले होते त्यापैकी पाच मिनिटांमध्ये साक्षी यांनी सामना 5-5 अशा गुणांनी बरोबरीत आणला. आता मात्र उत्कंठा शिगेला पोहोचली होती. तोच सामना संपण्यास काही क्षण शिल्लक असतानाच त्यांनी दोन गुण मिळवले. आणि त्या जिंकल्या. या विजयाबद्दल प्रतिस्पर्ध्याकडून आवाहन दिले गेले. परंतु शेवटी निकाल साक्षीच्याच बाजूला लागला. शिवाय एक गुण अतिरिक्त मिळताना, अंतिमरीत्या 8- 5 ने सामना जिंकला. अशा पद्धतीने भारताला ऑलम्पिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवून देत पदकाचं खातं उघडलं. महिला कुस्ती प्रकारात भारताला पहिल्यांदाच ऑलम्पिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवून देत त्या प्रथम भारतीय महिला ठरल्या. भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन साक्षी मलिक यांचा गौरव केला.
केवळ मुलगी असल्याने खेळास विरोध करणाऱ्यांना ऑलिंपिक पदक जिंकून साक्षी यांनी चांगलीच चपराक दिली. यामधून मुलींनी खूप काही शिकण्यासारखे आहे मनाचा ठाम निर्धार आणि परिश्रमाची तयारी असल्यास यश आपल्या पायाशी लोळण घेतल्याशिवाय राहत नाही हे यामधून शिकण्यासारखे आहे.
This article On Zpshikshak Site was written by Mustapha Shaikh. He is a famous YouTuber and Blogger. He has experience in SEO, web development, and writing SEO content.