Saina Nehwal | सायना नेहवाल मराठी माहिती

Saina Nehwal  ही भारतीय बॅडमिंटनपटू आहे. ऑलिंपिक खेळात उपांत्यपूर्व फेरी गाठणारी व  जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी सायना पहिली भारतीय महिला म्हणून सायना चा गौरव केला जातो. जुन २००९ मध्ये झालेल्या इंडोनेशियन खुल्या स्पर्धांमध्ये अजिंक्यपद पटकावणारी सायना ही पहिली भारतीय महिला खेळाडू आहे

 

Saina Nehwal  यांचा जन्म 27 मार्च 1990 साली हरियाणा राज्यातील हिसार येथे  झाला. सायना नेहवाल यांच्या आई या हरियाणा राज्यातील बॅडमिंटन खेळाच्या राज्यस्तरीय खेळाडू होत्या. सायना नेहवाल यांना चंद्रशेह नावाची मोठी बहीण असुन बहीणीला व्हॉलीबॉलमध्ये आवड असुन बहीणही व्हॉलीबॉल खेळाडू आहे. त्यांचे वडील डॉ. हरवीर सिंह नेहवाल हे कृषी क्षेत्रात पी. एचडी असून ते हरियाणा कृषी विद्यापीठामध्ये कार्यरत आहेत.

Saina Nehwal यांचे प्राथमिक शिक्षण हरियाणा राज्यातील हिसार येथे पूर्ण झाले तर 12 वी चे शिक्षण सेंट अँन कॉलेज फॉर वूमेन, हैद्राबाद याठिकाणावरून पूर्ण केले. आई बडमिंटन खेळाडू असल्याने व राष्ट्रीय पातळीवर बॅडमिंटन खेळाडू बनण्याचे आईचे स्वप्न अपूर्ण राहील्याने सायना नेहवाल यांनी बॅडमिंटन खेळात करियर करायचे व राष्ट्रीय पातळीवर बॅडमिंटन खेळायचे ठरवले. त्या दृष्टिने सायना नेहवाल यांच्या वडीलांनी सायना यांना भरपूर पाठिंबा दिला. वडीलांनी स्वतःच्या भविष्य निर्वाह निधीतील रक्कम काढून सायना यांना बॅडमिंटनचे उत्कृष्ट प्रशिक्षण दिले. सायना नेहवालचे वडीलही विद्यापीठात चांगले खेळाडू होते.

सन 2006 मध्ये Saina Nehwal19 वर्षांखालील वयोगटातील सर्वोत्कृष्ट खेळाडू बनली. याच वर्षी सायनाने प्रतिष्ठेचा मानला जाणारा आशियाई उपग्रह बॅडमिंटन टुर्नामेंट जिंकून नवा विक्रम प्रस्थापित केला. हा विक्रम करणारी सायना प्रथम भारतीय ठरली. वयाच्या 16 व्या वर्षी फिलिपिन्स ओपन मधील 4 स्टार स्पर्धा जिंकून, ही स्पर्धा जिंकणारी प्रथम भारतीय महिला ठरण्याचा मान मिळवला. तसेच सायना ही स्पर्धा जिंकणारी सर्वात तरुण आशियाई महिला होती. 2008 मध्ये जागतिक ज्युनियर बॅडमिंटन चैम्पियनशिप जिंकणारी प्रथम भारतीय महिला ठरण्याचा मानही सायना नेहवाल यांच्याच कडे जातो. ऑलम्पिक खेळामध्ये प्रथमतः क्वार्टर फायनल पर्यत पोहचण्याचा पहिला खेळाडूचा मान सायना नेहवाल यांच्याकडे जातो.

Saina Nehwal यांच्या उत्कृष्ट खेळीमुळे त्यांना ‘द प्रॉस्टिझिंग प्लेअर’ असे नाव देण्यात आले. सायनाने ‘डोनेशिया ओपन’ जिंकून जगातील प्रमुख बॅडमिंटन मालिका जिंकली. 2010 च्या उबेर कप क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत नेहवालने भारतीय महिला संघाचे उपांत्यपूर्व फेरीत यशस्वी नेतृत्व केले. 2010 साली ऑल इंग्लंड सुपर सिरीजच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहचणारी ती प्रथम भारतीय महिला ठरली. याच वर्षांच्या इंडियन ओपन ग्रा. प्रि. गोल्ड स्पर्धा जिंकून सायनाने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू असण्याची कामगिरी पार पाडली. 2012 मध्ये स्वीस ओपन, थायलंड ओपन ग्रां.प्री. स्पर्धेत विजेता होण्याचा बहुमान मिळवला. तसेच जागतीक स्तरावर मानाच्या समजल्या जाणाऱ्या लंडन येथे आयोजित ऑल्मपिक बैंडमिंटन स्पर्धेत भारताला कास्य पदक मिळवून दिले.

सायना नेहवाल यांना त्यांच्या उत्कृष्ट खेळासाठी भारत सरकारकडून 2009 मध्ये अर्जुन पुरस्कार, 2010 मध्ये खेळातील अत्यंत मानाचा समजला जाणारा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारपद्मश्री पुरस्कार तसेच 2016 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.आपल्या आईने पाहीलेले आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सायना नेहवाल यांनी जे प्रयत्न केले ते निश्चितच वाखाणण्याजोगे व अनुकरणीय आहेत.

 

You May Also Know About-

Scroll to Top