पी व्ही सिंधू lऑलम्पिक रौप्य पदक विजेता 2016

पी. व्ही. सिंधू यांचे पूर्ण नाव पूसारला व्यंकट सिंधू असे असून त्या बॅडमिंटन खेळाच्या प्रसिद्ध खेळाडू आहेत. पी व्ही सिंधू यांचा जन्म 5 जुलै 1985 रोजी हैदराबाद येथे झाला. त्यांचे वडील भारतीय रेल्वेमध्ये नोकरीस आहेत. त्यांची आई पी. विजया वडील रमण हे दोघेही व्हॉलीबॉल खेळाचे राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहेत.

 

पी व्ही सिंधू Family:

P V Sindhu यांचे वडील भारतीय हॉलीबॉल संघाचे सदस्य होते. त्यांनी 1996 च्या सोल आशियाई खेळामध्ये कांस्यपदक जिंकले होते. त्यांना या खेळाबद्दल भारत सरकारने सन 2000 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले.

पी. व्ही. सिंधू शालेय शिक्षण:

पी व्ही सिंधू यांचे शालेय शिक्षण हैदराबाद येथील ऑक्सिलियम हायस्कूल येथे तर महाविद्यालयीन शिक्षण हे सेंट अन्स कॉलेज फॉर वुमेन,हैदराबाद या महाविद्यालयात झाले. सिंधू यांना खेळाचा वारसा असलेले कुटुंब लाभल्याने घरामध्ये पूर्वीपासूनच खेळास पूरक असे वातावरण होते. आई वडिलांना हॉलीबॉल मध्ये आवड असताना देखील सिंधू या बॅडमिंटन खेळाकडे आकर्षित झाल्या कारण त्यांच्यावर इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेता पुलेला गोपीचंद यांच्या खेळाचा प्रभाव होता. सिंधू यांनी वयाच्या आठव्या वर्षापासूनच बॅडमिंटन खेळाचा सराव सुरू केला. वडील रेल्वेत असल्याने सिकंदराबाद येथील भारतीय रेल्वेच्या बॅडमिंटन कोर्टवर मेहबूब अली यांचे मार्गदर्शनाखाली बॅडमिंटन खेळाचा सराव केला. नंतर त्यांनी गोपीचंद फुले ला बॅडमिंटन आकादमी मध्ये प्रवेश घेत आपल्या बॅडमिंटन कार कीर्ती सुरुवात केली. सराव करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या अकादमीचे अंतर घरापासून 56 किलोमीटर असताना देखील खेळण्याची जिद्द आणि कठोर मेहनतीने यश संपादन केले.

पी. व्ही. सिंधू खेळ कारकीर्द:

गोपीचंद बॅडमिंटन अकादमी मध्ये सहभागी झाल्यानंतर सिंधू यांनी अनेक मॅचेस मध्ये यश संपादन केले. 10 वर्षाखालील गटात दुहेरी प्रकारात पाचवी सर्वो ऑईल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप आणि अंबुजा सिमेंट ऑल इंडिया रँकिंग मध्ये एकेरी विजेतेपद जिंकले. त्याचप्रमाणे कृष्णा खेतान ऑल इंडिया टूर्नामेंट ऑल इंडिया रँकिंग सब ज्युनिअर नॅशनल आणि पुण्यातील अखिल भारतीय रँकिंग मध्ये दुहेरीचे विजेतेपद पटकावले. यासोबतच एक्कावन्नाव्या राष्ट्रीय राज्य खेळामध्ये 14 वर्षाखालील सांघिक सुवर्णपदक जिंकले. पुढे सिंधू यांनी दक्षिण कोरियाचे प्रशिक्षक पार्क ताई सांग यांच्याकडून बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेतले.

भारतातील सर्वात यशस्वी खेळाडू पैकी पी व्ही सिंधू या एक आहेत. सिंधू यांनी ऑलिंपिक आणि बी डब्ल्यू एफ सर्किट स्पर्धेसह विविध स्पर्धांमध्ये बक्षिसे जिंकली आहेत. ऑलम्पिक स्पर्धेमध्ये सलग दोन वेळा पदके मिळवणाऱ्या द्वितीय क्रमांकावरील वैयक्तिक ऍथिलिटचा मान ही पी. व्ही. सिंधू यांच्याकडे जातो. एप्रिल 2017 मध्ये बॅडमिंटन खेळाच्या जागतिक क्रमवारीत त्या द्वितीय क्रमांकावर होत्या.

2016 मध्ये रिओ येथे खेळल्या गेलेल्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेचे सिंधू यांनी प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत त्या अंतिम फेरीत प्रवेश मिळालेल्या प्रथम भारतीय बॅडमिंटन खेळाडू ठरल्या. या खेळामध्ये त्यांनी स्पेनच्या कॅरीलोना मारीन या खेळाडूस हरवून ऑलिंपिक स्पर्धेत रौप्य पदक पटकावले. त्याचप्रमाणे 2020 च्या टोकियो येथे झालेल्या ऑलंपिक स्पर्धेतही सिंधू यांनी कांस्यपदक पटकावले याप्रमाणे दोन ओलंपिक पदके मिळवणाऱ्या त्या प्रथम भारतीय महिला ठरल्या. 2021 मध्ये फोर्ब्स च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूच्या यादीमध्ये सिंधूंनी स्थान मिळवले.

पी व्ही सिंधू यांच्या बॅडमिंटन खेळातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल भारत सरकारने त्यांना अर्जुन पुरस्कार, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, पद्मश्री व पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले. अशा उत्कृष्ट खेळाडू कडून खेळाची शिकवण घेऊन खेळाडू तयार होणे तसेच स्वतःचे, कुटुंबाचे व राष्ट्राचे नाव उंचावणे अपेक्षित आहे.

Scroll to Top