कर्णम मल्लेश्वरी यांचा जन्म आंध्र प्रदेश या राज्यांमधील उसावनी पेटा या छोट्या गावात 01/06/1975 रोजी झाला. कर्णम मल्लेश्वरी यांचे वडील कर्णम मनोहर हे रेल्वे खात्यात कॉन्स्टेबल होते.
कर्णम शब्दाचा अर्थ संस्कृत मध्ये कीर्ती,प्रतिष्ठा,अभिमान असा होतो जो मल्लेश्वरीला साजेसा असा आहे. मल्लेश्वरी यांना एक भाऊ व चार बहिणी होत्या. त्यांच्या आईने सहा अपत्या पैकी चार मुलींना वेटलिफ्टिंग करायला शिकवले. मल्लेश्वरी यांची आई शामल यांनी सुरुवातीला बांबूच्या काड्याला वजने बांधून मुलींना वजन उचलण्याचे प्रशिक्षण दिले. मल्लेश्वरी यांच्या आईने वजन उचलण्याची प्रेरणा मल्लेश्वरी यांच्या काकाच्या मुलांकडून घेतली. पुढे मल्लेश्वरीला तिच्या पालकांनी श्रीकाकुलम या जिल्ह्याच्या ठिकाणी अम्मी नायडू या जिम मध्ये वजन उचलण्याच्या प्रशिक्षणास ठेवले. या काळामध्ये वयाच्या बाराव्या वर्षीच मल्लेश्वरी ची शाळा सुटली. शालेय शिक्षण न घेताच मल्लेश्वरीने वेटलिफ्टिंग मध्ये सातत्याने प्रगती केली. पुढे मल्लेश्वरीला खेळाच्या निमित्ताने विविध ठिकाणी जावे लागे. त्यानिमित्ताने मल्लेश्वरीच्या आईने सोबत रॉकेलची चूल घेऊन मुलीला घरचे जेवण तयार करून खाऊ घातले.मल्लेश्वरी ची धाकटी बहीण कृष्णा कुमारी ही राष्ट्रीय वेटलिफ्टिंग चॅम्पियन होती.
1993 मध्ये कर्णम मल्लेश्वरीने मेलबर्न येथे झालेल्या अजिंक्यपद स्पर्धेत 54 किलो वजन गटात कांस्यपदक पटकावले. पुढील वर्षी 1994 ला मल्लेश्वरीने इस्तंबूल येथे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून जागतिक विजेता ठरली. त्यावेळी ती सुवर्णपदक जिंकणारी प्रथम भारतीय महिला होती तसेच 1994 च्या अखेरीस मल्लेश्वरीने हिरोशिमा येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आरोग्य पदक पटकावले.
1995 मध्ये ग्वांगझू येथे झालेल्या स्पर्धेत कर्णम मल्लेश्वरीने पुन्हा 54 किलो वजन गटांमध्ये सहभाग नोंदवत जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. तसेच 1996 मध्ये मल्लेश्वरीला केवळ कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. मल्लेश्वरीने 29 आंतरराष्ट्रीय पदके पटकावली त्यापैकी 13 पदके ही सुवर्ण होती. पुढे मल्लेश्वरीने ऑलम्पिक 2000 स्पर्धेची तयारी केली. मल्लेश्वरी सरावाने हळूहळू तिच्या ध्येयाकडे वाटचाल करत होती. सुरुवातीस 105 किलो वजन, १०७.५ किलो, ११० किलो, १२५ किलो व 130 किलो वजन अशा प्रकारे तिच्या प्रगतीचा आलेख वाढत गेला. अशा प्रकारे मल्लेश्वरीने सन 2000 साली सिडणे येथे झालेल्या ऑलंपिक स्पर्धेत मल्लेश्वरी यांनी स्कॅरच प्रकारात 110 किलो वर्गात आणि क्लीन अँड जर्क प्रकारात 130 किलो वजन उचलले. अशाप्रकारे 240 किलो वजन उचलल्यामुळे मल्लेश्वरी या भारतासाठी ऑलिंपिक स्पर्धेत पदक पटकावणाऱ्या प्रथम भारतीय महिला ठरल्या. भारत सरकारने त्यांच्या खेळाचा गौरव म्हणून त्यांना अर्जुन पुरस्कार, राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार व पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
कर्णम मल्लेश्वरीची सर्वात मोठी कामगिरी 2000 सिडनी ऑलिम्पिकमध्ये झाली, जिथे तिने महिलांच्या 69 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले. तिच्या कामगिरीने ती केवळ ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला बनली नाही तर वेटलिफ्टिंगमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती पहिली भारतीय बनली.
कर्णम मल्लेश्वरीच्या संपूर्ण कारकिर्दीत, कर्णम मल्लेश्वरीने विविध आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि अनेक पुरस्कार जिंकले. तिने 1994 आणि 1995 मध्ये महिलांच्या 54 किलो गटात जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप जिंकली होती. मल्लेश्वरीने कॉमनवेल्थ गेम्स आणि आशियाई चॅम्पियनशिपमध्येही सुवर्णपदक जिंकले होते.
कर्णम मल्लेश्वरीच्या वेटलिफ्टिंगमधील कामगिरीने भारतातील खेळ लोकप्रिय करण्यात आणि खेळाडूंच्या नवीन पिढीला प्रेरणा देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तिच्या यशाने देशातील महिलांच्या वेटलिफ्टिंगकडे लक्ष वेधले आणि खेळाच्या पुढील वाढीचा आणि ओळखीचा मार्ग मोकळा झाला.
You May Also Know:
This article On Zpshikshak Site was written by Mustapha Shaikh. He is a famous YouTuber and Blogger. He has experience in SEO, web development, and writing SEO content.