इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती योजना :-गुणवान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शाळातील विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती योजना अस्तित्वात आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत घेत असलेल्या स्पर्धात्मक परीक्षांच्या निकालावर प्रामुख्याने गुणवत्तेनुसार शिष्यवृत्या दिल्या जातात.
Table of Contents
पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना (इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती योजना)
Your Attractive Heading
• योजनेची उद्दीष्ट, व्याप्ती, पार्श्वभूमी – गुणवान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शाळातील विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती योजना अस्तित्वात आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत घेत असलेल्या स्पर्धात्मक परीक्षांच्या निकालावर प्रामुख्याने गुणवत्तेनुसार शिष्यवृत्या दिल्या जातात. इयत्ता ५ वी साठी तीन वर्ष व इयत्ता ८ वी साठी २ वर्षे शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्षात १० महिन्यासाठी दिली जाते. प्रत्येक जिल्हयाचे ग्रामीण व नागरी क्षेत्रासाठी शिष्यवृत्यांचे स्वतंत्र व ठराविक संच निर्धारित केलेले आहेत. शासन निर्णय क्र. एससीएच/२००९/९०/९/केपुयो दि.२२/०७/२०१० अन्वये पुढीलप्रमाणे
राज्यात उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती व माध्यमिक शिष्यवृत्ती संच मंजूर करण्यात आले आहेत. सदरची शिष्यवृत्ती बँकेमार्फत शिष्यवृत्तीधारकाच्या खात्यावर सन २०१०-११ पासून जमा करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
पात्रतेचे निकष -पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून देय राहील.
१. शासनमान्य (शासकीय/अनुदानित/विना अनुदानित/कायम विनाअनुदानित) शाळांमधील विद्यार्थी सदर शिष्यवृत्ती परीक्षा देण्यास पात्र राहतील.
२. आय.सी.एस.ई व सी.बी.एस.ई. अभ्यासक्रम राबविणाया शाळांतील विद्यार्थ्यांसाठी, सदर शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी शासन खाली अटींच्या
अधीन राहून मान्यता देत आहे :-
२.१. शिष्यवृत्ती सदर परीक्षेला बसणाया विद्यार्थ्यांसाठी प्रचलित नियमानुसार वयाची अट राहील.
२.२. सदर विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती परीक्षेस सध्या प्रचलित असलेले विहित शुल्क आकारण्यात येईल.
२.३. महाराष्ट्र शासन अंतर्गत राबविणाया शाळांतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना असलेली परीक्षा फी माफीची सवलत या विद्यार्थ्यांना मिळणार नाही.
२.४ सदर विद्यार्थ्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
२.५ सदर विद्यार्थी गुणवत्ता यादीत आल्यास पहिल्या ५० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल व गुणानुक्रम कळविण्यात येईल. मात्र त्यांना शिष्यवृत्तीची रोख रक्कम दिली जाणार नाही.
२.६ उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना गुणपत्रके देण्यात येतील.
30 Vidyarthi labhachya yojana in marathi| विद्यार्थी लाभाच्या योजना
• परीक्षेसाठी पात्रता –
१. इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी मध्ये शिकणारे सर्व अभ्यासक्रमाच्या शाळेतील विद्यार्थी.
२. शिष्यवृत्ती परीक्षेस पात्र होण्यासाठी विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावे.
३. सदर शिष्यवृत्ती महाराष्ट्र राज्य परिषद, पुणे यांनी दरवर्षी घेतल्या गेलेल्या स्पर्धा परिक्षेच्या आधारे दिली जाईल.
• परीक्षेचे माध्यम – मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, तेलगु, सिंधी व कन्नड (सेमी इंग्रजी सर्व माध्यमांसाठी फक्त इंग्रजी माध्यमा व्यतिरिक्त)
• शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वयोमर्यादा- विद्यार्थ्याचे वय १ जून रोजी खाली कोष्टकात दर्शविलेल्या वयापेक्षा जास्त नसावे.
पूर्व उच्च प्राथमिक शाळा | पूर्व माध्यमिक शाळा | |||
मुले | मुली | मुले | मुली | |
वर्षे | वर्षे | वर्षे | वर्षे | |
बिगर मागासलेल्या वर्गासाठी | 12 | 12 | 15 | 15 |
मागासलेल्या वर्गासाठी | 14 | 15 | 17 | 18 |
• परीक्षेची तारीख व दिनांक –
१. शिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसया/तिसया रविवारी घेण्यात यावी.
२. शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेने निश्चित केलेल्या केंद्रावर घेतली जाईल.
३. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेच्या अंतिम निकाल यादी मध्ये नाव असावे.
४. शिष्यवृत्ती धारकाच्या समाधानकारक प्रगतीला अनुसरुन शिष्यवृत्ती धारकाला शिष्यवृत्ती देण्यात येते.
• परीक्षेसाठी अर्ज
सदर परीक्षेसाठीचे अर्ज हे विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेच्या
मुख्याध्यापकांमार्फत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ठरविलेल्या वेळापत्रकानुसार ऑनलाईन सादर करावेत.
परीक्षा शुल्क
सर्वसाधारण विद्यार्थी प्रवेश शुल्क रु.५०/- व परीक्षा शुल्क रु.१५०/- एकूण शुल्क रु.२००/-
मागासवर्गीय व दिव्यांग विद्यार्थी – प्रवेश शुल्क रु.५०/- परीक्षा शुल्क रु.७५/- एकूण
शुल्क रु.१२५/-
• शाळा संलग्नता – शुल्क रु.२००/-
• परीक्षेचे माध्यम मराठी/हिंदी/गुजराथी/उर्दू/इंग्रजी/सिंधी/तेलगू/कन्नड –
• परीक्षेचे विषय : अ) पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी)
पेपर १ – प्रथम भाषा व गणित (गुण ७५, वेळ : ९० मिनिटे)
पेपर २ – तृतीय भाषा व बुध्दीमत्ता चाचणी (गुण ७५, वेळ : ९० मिनिटे)
ब) पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी)
पेपर १ – प्रथम भाषा व गणित (गुण ७५, वेळ : ९० मिनिटे)
पेपर २ – तृतीय भाषा व बुध्दीमत्ता चाचणी (गुण ७५, वेळ : ९० मिनिटे)
वरील विषयांच्या प्रश्नांची काठिण्य पातळी, कठीण प्रश्न ३० टक्के, मध्यम प्रश्न ४० टक्के व सोपे प्रश्न ३० टक्के अशी राहील.
• अभ्यासक्रम :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद यांची इ. ५वी व ८वी ची मार्गदर्शक पुस्तिका.
• वेबसाईट- https://www.mscepuppss.in
• शिष्यवृत्ती प्रदानाच्या अटी –
१. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांने लगेचच्या वर्षी मान्यता प्राप्त प्राथमिक/माध्यमिक शाळेत प्रवेश घेतला पाहिजे. जे शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी शाळेत प्रवेश घेणार नाहीत अशा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रद्द करण्यात येईल.
२. शिष्यवृत्ती परीक्षा पास झाल्याच्या नंतरच्या वर्षापासून तीन / दोन वर्षे सदर शिष्यवृत्ती चालू राहील, त्यासाठी शिष्यवृत्ती धारकाला नियमित उपस्थिती, चांगले वर्तन व समाधानकारक प्रगती या अटींची पूर्तता करावी लागेल, तसेच शाळा प्रमुखाचे प्रमाणपत्र द्यावे लागेल. यापैकी एकाही अटीची पूर्तता होत नसल्यास पात्र विद्यार्थ्यांस शिष्यवृत्ती मिळणार नाही..
३. विद्यार्थ्यांने शाळा बदल केल्यास, विद्यार्थ्यांने/पालकांने शिष्यवृत्तीसाठी नवीन
मुख्याध्यापकामार्फत संबंधित जिल्हयाच्या शिक्षणाधिकारी माध्यमिक/योजना यांच्याकडे प्रस्ताव सादर करावा.
४. शिक्षण संचालक (योजना) महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या परवानगी शिवाय कोणीही शिष्यवृत्ती गोठवू शकणार नाही.
- MHCET-Pariksha Velapatrak | Revised Tentative Schedule of MHCET-2025-26
- Republic Day speech in English 2025 | प्रजासत्ताक दिन भाषण इंग्रजी
- MHT CET 2025 Registration Process Started | MHT CET 2025 नोंदणी प्रक्रिया सूरू
- ALL INDIA SAINIK SCHOOLS ENTRANCE EXAMINATION 2025 | Online अर्ज भरणे प्रक्रिया सुरू
- How To Apply Pan Card 2.0 Online | पॅन कार्ड 2.0 घरबसल्या अर्ज करा, QR कोडसह नवीन पॅन मिळवा!