Pre-Matric Scholarship For Minority : धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेली केंद्रपुरस्कृत मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना

Pre-Matric Scholarship For Minority : धार्मिक अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी मा. प्रधानमंत्री यांनी १५ कलमी कार्यक्रमातंर्गत धार्मिक अल्पसंख्यांक इयत्ता १ली ते १०वी पर्यंतच्या सर्व शासकीय निमशासकीय खाजगी शाळांमधून शिक्षण घेणाया विद्यार्थ्यांसाठी Pre-Matric Scholarship For Minority योजना शासनाने दिनांक २३ जुलै २००८ पासून सुरु केली आहे.

Pre-Matric Scholarship For Minority : धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेली केंद्रपुरस्कृत मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना

प्रस्तावना :-

धार्मिक अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी मा. प्रधानमंत्री यांनी १५ कलमी कार्यक्रमातंर्गत धार्मिक अल्पसंख्यांक इयत्ता १ली ते १०वी पर्यंतच्या सर्व शासकीय निमशासकीय खाजगी शाळांमधून शिक्षण घेणाया विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना शासनाने दिनांक २३ जुलै २००८ पासून सुरु केली आहे. धार्मिक अल्पसंख्याकांमध्ये केंद्र शासनाने मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौध्द, पारशी व जैन या धर्माचा समावेश केलेला आहे.

सन २०१५-१६ पासून अल्पसंख्याक मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती ही योजना शिक्षण संचालनालय (योजना) संचालनालयाकडून राबविली जाते.

केंद्रशासनाच्या दिनांक २९/११/२०२२ रोजीच्या पत्रान्वये सदर योजना शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या वर्षापासून फक्त इयत्ता ९वी व १०वी साठी लागू राहील.

• या योजनेची अंमलबजावणी केंद्रशासनाच्या www.scholarships.gov.in या संकेतस्थळावरून करण्यात येत आहे. तसेच पात्र लाभार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ Public Finance Management System – PFMS मार्फत संबंधितांच्या बँक खात्यावर परस्पर Direct Benefit Transfer (DBT) द्वारे जमा केली जाते.

Pre-Matric Scholarship For Minority उद्दिष्ट्ये :-

१. अल्पसंख्यांक समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना इयत्ता १०वी पर्यंत शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळणे.

२. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची मोठया प्रमाणावर होणारी गळती थांबविणे.

३. अल्पसंख्याक पालकांना त्यांच्या पाल्यास शाळेत पाठविण्यासाठी उत्तेजन देणे. ४.अल्पसंख्याक मुलांच्या पालकांचा त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणावर होणा-या खर्चाचा भार कमी करणे.

५. शिक्षणाद्वारे अल्पसंख्याक मुलांचे सक्षमीकरण करणे.

६. अल्पसंख्याक समाजाची सामाजिक/आर्थिक उन्नती होण्यास मदत होणे.

पात्रतेचे निकषः –

१. शासन मान्यताप्राप्त सर्व व्यवस्थापनाच्या अनुदानित / विनाअनुदानित / स्वयंअर्थसहाय्यित शाळांतील इयत्ता ९वी व १०वी मध्ये शिकणारे/शिकणाया अल्पसंख्याक समाजातील पात्र विद्यार्थी / विद्यार्थीनी

२. मागील शैक्षणिक वर्षात ५० टक्केपेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे.

३. पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. एक लाखापेक्षा जास्त नसावे.

४. एका कुटुंबातील २ पेक्षा अधिक पाल्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही.

५. एकूण पात्र विद्यार्थ्यांपैकी ३० टक्के शिष्यवृत्ती विद्यार्थीनींसाठी राखीव आहे.

६. आधारकार्ड नंबर असणे आवश्यक आहे. आधारकार्ड बँक खात्याशी जोडणे आवश्यक आहे.

७. जे विद्यार्थी ते शिकत असलेल्या शाळांच्या वसतिगृहात राहत असतील अथवा राज्य शासनाच्या वसतिगृहात राहत असतील केवळ तेच विद्यार्थी या योजनेत वसतिगृहाचे विद्यार्थी गणले जातील.

८. विद्यार्थ्यांकडून शाळेच्या शिस्तीचा अथवा शिष्यवृत्तीच्या कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास शिष्यवृत्ती स्थगित करण्यात येईल अथवा संपुष्टात आणण्यात (रद्द करण्यात) येईल.

९. जर एखाद्या विद्यार्थ्यास चुकीच्या माहितीच्या आधारे शिष्यवृत्ती दिली गेल्याचे निदर्शनास आल्यास त्या विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती तात्काळ रद्द करण्यात येईल व त्यास प्रदान करण्यात आलेल्या शिष्यवृत्तीच्या रकमेची वसूली करण्यात येईल.

१०.कोणत्याही कारणामुळे एका शैक्षणिक वर्षाचे अंतर पडल्यास नूतनीकरण शिष्यवृत्ती अर्ज भरता येणार नाही. तसेच शिष्यवृत्तीच्या नियमांच्या आधारे एकदा बंद केलेली शिष्यवृत्ती कोणत्याही परिस्थितीत पुनरुज्जीवित केली जात नाही.

११. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावयाचे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या फरकासाठी विद्यार्थ्याचा दावा विचारात घेतला जाणार नाही.

Pre-Matric Scholarship For Minority परीक्षा शुल्क –

सर्वसाधारण विद्यार्थी प्रवेश शुल्क रु.५०/- व परीक्षा शुल्क रु.१५०/- एकूण शुल्क रु.२००/-

मागासवर्गीय व दिव्यांग विद्यार्थी – प्रवेश शुल्क रु.५०/- परीक्षा शुल्क रु.७५/- एकूण

शुल्क रु.१२५/-

शाळा संलग्नता – शुल्क रु.२००/-

•परीक्षेचे माध्यम – मराठी/हिंदी/गुजराथी/उर्दू/इंग्रजी/सिंधी/तेलगू/कन्नड –

•परीक्षेचे विषय : अ) पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी)

पेपर १ प्रथम भाषा व गणित (गुण ७५, वेळ : ९० मिनिटे)

पेपर २ तृतीय भाषा व बुध्दीमत्ता चाचणी (गुण ७५, वेळ : ९० मिनिटे)

ब) पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी)

पेपर १ प्रथम भाषा व गणित (गुण ७५, वेळ : ९० मिनिटे)

पेपर २ तृतीय भाषा व बुध्दीमत्ता चाचणी (गुण ७५, वेळ : ९० मिनिटे)

वरील विषयांच्या प्रश्नांची काठिण्य पातळी, कठीण प्रश्न ३० टक्के, मध्यम प्रश्न ४० टक्के व सोपे प्रश्न ३० टक्के अशी राहील.

Pre-Matric Scholarship For Minority
Pre-Matric Scholarship For Minority
Scroll to Top