Headmaster : मुख्याध्यापक हे शाळा किंवा विद्यालय तसेच महाविद्यालय यांचे प्रमुख असतात, शाळेच्या प्रशासकीय तसेच भौतिक कामांचे नियोजन व जबाबदारी मुख्याध्यापकांची असते.
Table of Contents
मुख्याध्यापक यांची दररोज करायची कामे :
तपासणी :-
- शिक्षक हजेरी पत्रक
- कॅटलॉग
- गैरहजेरीसंबंधात
- कॅशबुक तपासून सही करणे; लेजरबुकवरील नोंदी पाहणे
- शालेय कामकाज, अध्यापन, स्वच्छता
- दैनंदिनीत शालेय कार्याची नोंद करणे इत्यादी.
- www.inmyschool.com या संकेतस्थळाला रोज भेट देऊन शिक्षणविभागातर्फे प्रसारित केलेल्या सूचनांचा आढावा घेणे.
- दर 3 महिन्यांनी शाळेच्या कर्मचारी वर्गाच्या income tax deduction ची माहिती upload करणे.
- माध्यान्ह भोजन (MDM) रोज online नोंद करणे.
मुख्याध्यापक यांची प्रत्येक सप्ताहात करायची कामे :
(1) अध्यापन कार्य करणे (किमान सहा तासिका)
(2) पाठनिरीक्षणे (किमान 2 तासिका)
(3) पत्रव्यवहार करणे.
मुख्याध्यापक यांची प्रत्येक महिन्यात करायची कामे :
(1) रिसिट-पेमेंट स्टेटमेंट तपासणे.
(2) बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट तपासणे.
(3) खर्चाची व्हाऊचर्स तपासणे.
(4) महिनाअखेर शिक्षकांनी केलेल्या कामाचा तपशील पाहणे.
(5) मासिकवार नियोजनानुसार प्रत्येक तुकडीचे होणारे अध्ययन पूर्ण झाले किंवा नाही ते पाहणे.
(6) सेवकांच्या रजांच्या नोंदी तपासणे.
(7) पगारपत्रक खात्याकडे online पाठवणे.
(8) शिक्षण खात्याशी करायचा पत्रव्यवहार पूर्ण करणे.
(9) शिक्षक सभा घेणे.
(10) शिक्षक-पालक सभा घेणे.
(11) शालेय समिती व शालेय विकास समितीची दोन महिन्यांतून एकदा सभा घेणे.
ही महत्त्वपूर्ण जबाबदारी यशस्वीपणे पार पाडता यावी, यासाठी एक कृतिक्रम पुढे देत आहोत. यात आवश्यकता वाटल्यास आपण सुधारणा करून त्याची कार्यवाही करावी :
वर्षभरातील कामाची मासिकवार आखणी करणे.
प्रत्येक महिन्यातील प्रत्येक आठवड्यात पार पाडायची कामे निश्चित करणे.
प्रत्येक आठवड्याच्या प्रारंभी, येणाऱ्या प्रत्येक दिवसाच्या महत्त्वपूर्ण कामाची नोंद करणे.
1. मुख्याध्यापक दैनंदिनीत ‘नियोजित तारखांवर करायची कामे’ या शीर्षकाखाली त्यांची नोंद करणे.
- सकाळी कामकाजाला प्रारंभ करण्यापूर्वी त्या दिवशीची कामे शांतपणे नजरेखालून घालणे. आणखी काही नोंदी करायच्या असतील तर त्या करणे.
- कामांचे अग्रक्रम ठरवून क्रमवारी (Priorities) लावणे.
- दिवसअखेर पूर्ण झालेली नियोजित कामे व अपूर्ण राहिलेली कामे यांची नोंद करणे.
- अपूर्ण कामे दुसऱ्याच दिवशी प्रथम पूर्ण करणे व नंतर त्या दिवसाची कामे करणे.
- अंदाजपत्रकातील तरतुदींनुसार खर्च होतो किंवा नाही यांवर लक्ष ठेवणे.
वाचन संस्कृती जपणे : ग्रंथांचे प्रदर्शन भरवणे लेखकांची छायाचित्रे ग्रंथांसोबत लावणे यातील काही ग्रंथांसंबंधात साहित्यिक चर्चा घडवून आणणे दर आठवड्याला ग्रंथालयातील 25 ग्रंथ विद्यार्थ्यांच्या निरीक्षणासाठी ठेवणे विद्यार्थ्यांना लेखन करण्यासाठी प्रोत्साहित करणे.