OBC Needs Only Non Creamylayer : विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनाकरिता नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र बंधनकारक करणेबाबत.
Table of Contents

For OBC Only Non Creamylayer Certificate is Necessary
विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र बंधनकारक.
“राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित व शासन मान्यता प्राप्त खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालये/तंत्रनिकेतने आणि शासकिय विद्यापीठात विनाअनुदानित तत्वावर सुरु असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेंतर्गत पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा सन 2017-18 या शैक्षणिक वर्षापासून रुपये 6 लक्ष वरुन रुपये 8 लक्ष करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे”
सदर शासन निर्णयातील उपरोक्त मजकुरा ऐवजी खालीलप्रमाणे वाचावे.
शासकीय, अशासकीय अनुदानित व शासन मान्यता प्राप्त खाजगी विनाअनुदानित वकायम विनाअनुदानित महाविद्यालये/तंत्रनिकेतने आणि शासकिय विद्यापीठात विनाअनुदानित तत्वावर सुरु असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनाकरिता उत्पन्नाची अट रद्द करण्यात येत असून त्याऐवजी नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.”
सदर शासन निर्णय सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
- NEET UG 2026 महाराष्ट्र CAP Registration व Merit List Updates
- 15 August Speech in English 2026 | 10 Best Independence Day Speeches for Students
- AI Saathi for Educator: शिक्षकांसाठी AI प्रशिक्षण का आवश्यक आहे? | संपूर्ण मार्गदर्शक 2026
- ८ वा वेतन आयोग २०२६: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पगार आणि पेन्शनमध्ये किती होणार वाढ? सविस्तर माहिती
- DDO CODE LIST : DDO Code For Schools in Block Ashti
This article On Zpshikshak Site was written by Mustapha Shaikh. He is a famous YouTuber and Blogger. He has experience in SEO, web development, and writing SEO content.