BHMNS: धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीनीसाठी बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना

BHMNS : पार्श्वभूमी – अल्पसंख्याक समाजातील गुणवंत मुलींसाठी बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती ही योजना पूर्वी अल्पसंख्याक मुलींसाठी मौलाना आझाद राष्ट्रीय शिष्यवृत्ती म्हणून ओळखली जात होती आणि ती दि.०३.०५.२००३ रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे आयोजित अल्पसंख्याकाच्या शैक्षणिक आणि आर्थिक विकासाच्या परिषदेत भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयी यांनी सुरु केली होती.

धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीनीसाठी बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना

सन २०२१-२२ पासून इयत्ता ९वी ते १२वी मधील अल्पसंख्याक मुलींसाठी सदर योजनेची अंमलबजावणी शिक्षण संचालनालय (योजना) कार्यालयामार्फत राबविली जाते.

सदर योजना अल्पसंख्याक (मुस्लीम, ख्रिशन, शीख, बौध्द, पारसी व जैन) समाजातील इयत्ता ९वी ते १२वी पर्यंतच्या मुलींसाठी आहे.

या योजनेची अंमलबजावणी केंद्रशासनाच्या www.scholarships.gov.in या संकेतस्थळावरून करण्यात येत आहे. तसेच पात्र लाभार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ Public Finance Management System – PFMS मार्फत संबंधितांच्या बँक खात्यावर परस्पर Direct Benefit Transfer (DBT) द्वारे जमा केली जाते.

BHMNS उद्दिष्टे :-

१.अल्पसंख्याक समाजातील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे.

२.ज्या मुली आर्थिक सहाय्या अभावी त्यांचे शिक्षण चालू ठेवू शकत नाही अशा मुलींना मदत करणे.

३.सदर शिष्यवृत्तीच्या रकमेमधून विद्यार्थीनींना शाळा/कॉलेजचे शुल्क, अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तक खरेदी, शैक्षणिक स्टेशनरी साहित्य खरेदी व वस्तीगृहाची फी इ. खर्चासाठी मदत करणे.

BHMNS पात्रतेचे निकषः-

  • शासनमान्यता प्राप्त सर्व व्यवस्थापनाच्या अनुदानित / विनाअनुदानित / स्वयंअर्थसहाय्यित शाळांतील इयत्ता ९वी ते १२वी मध्ये शिकणाया अल्पसंख्यांक समाजातील पात्र विद्यार्थीनी.
  • मागील शैक्षणिक वर्षात ५० टक्केपेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे.
  • पालकाचे वार्षिक उत्पन्न रु. २ लाखापेक्षा कमी असावे.
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे सक्षम अधिकायाच्या सहीचे असणे बंधनकारक आहे.
  • एका कुटुंबातील २ पेक्षा अधिक पाल्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही.
  • आधारकार्ड नंबर असणे तसेच बँक खात्याशी जोडणे आवश्यक आहे.
  • इतर कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा.
  • शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावयाचे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या फरकासाठी विद्यार्थ्याचा दावा विचारात घेतला जाणार नाही.
  • विद्यार्थ्यांकडून शाळेच्या शिस्तीचा अथवा शिष्यवृत्तीच्या कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास शिष्यवृत्ती स्थगित करण्यात येईल अथवा संपुष्टात आणण्यात येईल.
  • जर एखाद्या विद्यार्थ्यास चुकीच्या माहितीच्या आधारे शिष्यवृत्ती दिली गेल्याचे निदर्शनास आल्यास त्यास प्रदान करण्यात आलेल्या शिष्यवृत्तीच्या रकमेची वसूली करण्यात येईल.

BHMNS शिष्यवृत्तीचे दर :-

  • इयत्ता ९वी व इयत्ता १०वी च्या मुलींना वार्षिक रुपये ५,०००/-
  • ११ वी व १२ वी च्या मुलींसाठी वार्षिक ६,०००/- रुपये
Scroll to Top