PAT: Annual Exam Time table 2024-नियतकालिक मूल्यांकन (PAT) अंतर्गत संकलित मूल्यमापन चाचणी २ आणि इयत्ता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षेसंदर्भात सुधारित सूचना=>
Table of Contents
१. शासन निर्णय क्रमांकः आरटीई-२०२२/प्र.क्र.२७६/एसडी.१ दि. ०७.१२.२०२३
२. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/PAT संमू – २/२०२३-२४/११८२ दि. ०७.०३.२०२४
उपरोक्त विषयाच्या अनुशंगाने संदर्भ क्र. २ अन्वये नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) (संकलित मूल्यमापन – २) व इयत्ता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षेच्या आयोजनासंदर्भात सविस्तर सूचना देणेत आलेल्या होत्या. त्या अनुषंगाने सदर परीक्षांच्या बाबतीतील अधिक स्पष्टीकरणासाठी सविस्तर सूचना खालीलप्रमाणे आहेत. नियतकालिक मूल्यांकन अंतर्गत संकलित मूल्यमापन २ द्वारे शासकीय व स्थानिक स्वराज संस्थांच्या आणि खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता तिसरी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांची प्रथम भाषा, गणित व इंग्रजी या विषयांची दहा माध्यमात चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका, उत्तर पत्रिका व उत्तर सूची पुरविण्यात येणार आहेत.
३. संदर्भ क्र. २ नुसार दिनांक ०२.०४.२०२४ ते ०४.०४.२०२४ या कालावधीत संकलित मूल्यमापन – २ घेण्याचे नियोजन कळविण्यात आलेले होते. परंतु काही तांत्रिक कारणास्तव सदर संकलित मूल्यमापन – २ ही दि. ०४.०४.२०२४ ते ०६.०४.२०२४ या कालावधीमध्ये घेण्यात यावी. त्याचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे.
३. इयता ३ री, ४ थी, ६ वी व ७ वी या इयत्तांना प्रथम भाषा, गणित व इंग्रजी हे विषय सोडून इतर विषयांच्या संकलित मूल्यमापन -२ च्या प्रश्नपत्रिका वर्ग/विषय शिक्षकांनी स्वतः तयार करून नियमानुसार आपल्या शाळेपुरते परीक्षा घेण्याचे नियोजन करावे.
४. वेळापत्रकात दिलेल्या वेळेत शाळेच्या स्थानिक गरजेनुसार बदल करता येतील परंतु दिनांक, विषय व इतर बाबतीत बदल करण्यात येऊ नयेत.
५. संकलित मूल्यमापन २ अंमलबजावणी संदर्भात संदर्भ क्र. २ नुसार सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
• इयता पाचवी व आठवीसाठी (Annual Exam Time table 2024) परीक्षाः
२. संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे इयता पाचवी व आठवी करिता शिक्षकांनी स्वतः शालेय स्तरावर प्रश्नपत्रिकांची निर्मिती करून सर्व विषयांची वार्षिक परीक्षा एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्याचे नियोजन करावे. तसेच पुनर्परीक्षा व निकालासंदर्भात कार्यवाही करावी.
४. याकरिता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे च्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या नमुन्याप्रमाणे प्रश्नपत्रिका तयार कराव्यात व वार्षिक परीक्षा घेणेत यावी. यासाठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका पुरविण्यात येणार नाहीत याची नोंद घ्यावी.
५. इयत्ता पाचवी व आठवी या वर्गाना PAT अंतर्गत उपरोल्लेखित तक्त्याप्रमाणे तीन विषयांची संकलित मूल्यमापन – २ व शासन निर्णयानुसार या तीन विषयांसह सर्व विषयांची वार्षिक परीक्षा या दोन्ही परीक्षा स्वतंत्रपणे घेणे बंधनकारक आहे. ज्या शाळांना शासना मार्फत घेण्यात येणारी PAT-३ लागू नाही त्यांनी फक्त सर्व विषयांच्या वार्षिक परीक्षेचे नियोजन विहित प्रक्रियेने करावयाचे आहे.
This article On Zpshikshak Site was written by Mustapha Shaikh. He is a famous YouTuber and Blogger. He has experience in SEO, web development, and writing SEO content.