26 January Bhashan | Republic Day Speech 2024

26 January Bhashan: आज आपण 26 January Bhashan म्हणजेच प्रजासत्ताक दिनाबद्दल भाषणे पाहणार आहोत. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला.स्वतंत्र भारताने 26 जानेवारी 1950 पासून संविधान अंमलबजावणी केली.म्हणून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत.

26 January Bhashan | Republic Day Speech 2024
26 January Bhashan

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मराठी भाषण-4

 

आज मांगल्याचा दिवस! आज भारतीय प्रजासत्ताक दिन आहे. आजचा दिवस प्रत्येक भारतीयाचा आहे. 

 

आजच्या या शुभ दिनाच्या कार्यक्रमाचे आदरणीय अध्यक्ष, व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे, आदरणीय गुरुजन वर्ग आणि उज्ज्वल भारताचे राजदूत, माझ्या बंधू-भगिनींनो…

 

 मी त्या सर्व वीरांना, महापुरुषांना वंदन करतो, ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी अमूल्य योगदान दिले… माझ्या प्रिय भारत मातेला अभिवादन करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो…

 

आज आपला भारत देश 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. प्रजासत्ताक दिन हा आपला सर्वात महत्वाचा राष्ट्रीय सण आहे. या राष्ट्रीय सणाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.

 

   मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीपासून स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर भारताच्या कारभारावर कोणतेच कायदे नव्हते. अशा वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समिती स्थापन करून  या समितीने जवळपास 2 वर्षे, 11 महिने आणि 18 दिवस अथक परिश्रम करून भारताला एक मजबूत संविधान दिले.

 

 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशात संविधान लागू करण्यात आले. आपला देश भारत एक सार्वभौम, लोकशाही, प्रजासत्ताक देश बनला. आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. या संविधानामुळेच आम्हा सर्वांना आमचे अधिकार  मिळाले आहेत.

 

आपला देश स्वतंत्र आणि प्रजासत्ताक बनवण्यासाठी अनेक शूर वीर आणि क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. भारताला स्वतंत्र आणि प्रजासत्ताक बनवण्यात क्रांतिकारकांचे मोठे योगदान आहे. शूरवीर, क्रांतिकारक आपले खूप ऋणी आहेत. त्यांच्यामुळेच आज आपण सुखाचे दिवस जगत आहोत. असे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद! जय भारत.

26 January Bhashan क्रमांक – 2

26 January Bhashan क्रमांक – 3

26 January Bhashan क्रमांक – 1

26 January Bhashan क्रमांक – 5

You May Also Like:

  1. 7 Amazing benefits Of Yoga
  2. Apaar Id Card मराठीं माहीती | One Nation One Card माहिती
  3. Marathi Bodh Katha | मराठी बोधकथा 50 | संस्कार कथा
  4. Marathi Suvichar I 1000+ मराठी सुविचार संग्रह
  5. 500+Samanarthi Shabd Marathi | Advanced समानार्थी शब्द | समान अर्थाचे शब्द
  6. 100 Alankarik shabd | अलंकारिक शब्द मराठी व्याकरण | मराठी अलंकारिक शब्द
  7. Marathi shuddh lekhan| मराठी शुद्धलेखन 12 नियम
Scroll to Top