26 January Bhashan क्रमांक 3
26 January Bhashan: आज आपण 26 January Bhashan म्हणजेच प्रजासत्ताक दिनाबद्दल भाषणे पाहणार आहोत. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला.स्वतंत्र भारताने 26 जानेवारी 1950 पासून संविधान अंमलबजावणी केली.म्हणून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत.
Table of Contents
सण आज तीन रंगांनी सजला
त्या सर्वांना मी नमन करतो
ज्यांनी देशासाठी इतिहास घडवला
माननीय अध्यक्ष महोदय, आदरणीय गुरुजन वर्ग तसेच येथे उपस्थित असलेली माझ्या बालमित्रांनो,
आज आपण २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करत आहोत. हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी आनंदाचा, सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. तुम्हा सर्वांना 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला राज्यघटनेची खरी गरज होती. संविधानाशिवाय देशाचा कारभार सुरळीत चालणार नाही. प्रत्येकाला शांततेत आणि समाधानाने जगता यावे, सर्वांना समान न्याय व हक्क मिळावेत यासाठी संविधान बनवण्याचे महान कार्य आपल्या देशात सुरू झाले. महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या घटना समितीने 2 वर्षे 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम घेऊन देशाची समृद्ध राज्यघटना तयार केली. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशात संविधान लागू झाले; देशाला प्रजासत्ताक घोषित करण्यात आले, आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. या संविधानामुळे प्रत्येक भारतीयाला भेदभाव न करता समान अधिकार मिळाले आहेत.
आपला भारत देश स्वतंत्र आणि प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जिवाची पर्वाही केली नाही. आज त्या सर्व शूर वीरांना वंदन करूया, त्यांच्यामुळेच आज आपण मोकळा श्वास घेत आहोत. आजही देशाच्या सीमेवर मातृभूमीची सेवा करण्यासाठी सैनिक अहोरात्र तत्पर आहेत. त्यांचा सदैव सन्मान करूया.
महान भारत माता,
आम्ही तिची मुले आहोत,
आपला भारत देश महान आहे.
म्हणा, भारत माता की जय, वंदे मातरम.
इतकं बोलून माझ्या भाषणाला पूर्णविराम. जय हिंद…जय भारत….जय महाराष्ट्र.
26 January Bhashan क्रमांक – 2
26 January Bhashan क्रमांक – 1
26 January Bhashan क्रमांक – 4
26 January Bhashan क्रमांक – 5
You May Also Like:
- 7 Amazing benefits Of Yoga
- Apaar Id Card मराठीं माहीती | One Nation One Card माहिती
- Marathi Bodh Katha | मराठी बोधकथा 50 | संस्कार कथा
- Marathi Suvichar I 1000+ मराठी सुविचार संग्रह
- 500+Samanarthi Shabd Marathi | Advanced समानार्थी शब्द | समान अर्थाचे शब्द
- 100 Alankarik shabd | अलंकारिक शब्द मराठी व्याकरण | मराठी अलंकारिक शब्द
- Marathi shuddh lekhan| मराठी शुद्धलेखन 12 नियम