Sandes App : NIC द्वारे विकसित Sandes ॲप चा वापर सर्व विभागाच्या शासकीय कामकाजामध्ये करण्याचा निर्णय केंद्रशासन व राज्यशासन यांनी घेतला आहे.
Table of Contents
केंद्र शासन आणि राज्य शासन, शासकीय कार्यालये व स्थानिक संस्थांमध्ये हजारो संदेश आणि संप्रेषणांची देवाणघेवाण होते. हे संदेश प्रामुख्याने मजकूर स्वरूपात असले तरी, ऑडिओ/व्हिडिओ क्लिप आणि नस्ती इत्यादींमधील माहितीचीदेखील सुरक्षितपणे देवाणघेवाण होत असते.
संदेस ॲप हे डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत आत्मनिर्भर भारताचा एक उपक्रम असून शासन ते शासन – G2G (Govt.to Govt.) आणि शासन ते नागरिक G2C (Govt.to Citizen) संप्रेषण/संदेश सुलभ करण्यासाठी मुक्त स्रोत आधारित, सुरक्षित आणि स्वदेशी इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म देणारी प्रणाली आहे.
संदेस ही सुरक्षितपणे शासकीय पायाभूत सुविधांवर आधारित प्रणाली आहे. तिचे धोरणात्मक नियंत्रण शासनाकडे आहे. संदेस ॲप हे गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवर कोणालाही डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.
30 Vidyarthi labhachya yojana in marathi| विद्यार्थी लाभाच्या योजना
संदेस (Sandes) ॲप हे Play/App Store वर प्रकाशित झालेल्या डेटा गोपनीयता आणि डेटा धारणा धोरणाद्वारे (Data Privacy and Data Retention Policy) नियंत्रित केले जाते. संदेस (Sandes) ॲप हे सुरक्षा प्रथम तत्त्वावर आधारित आहे आणि त्याद्वारे संदेश पाठविणारा व प्राप्त करणारा यांच्यामध्येच (एंड टू एंड एन्क्रिप्टेड) संदेशवहन प्रदान करते.
संदेस (Sandes) प्लॅटफॉर्म केवळ सांख्यिकीय विश्लेषणासाठी मेटाडेटा संग्रहित करतो आणि म्हणून प्रत्यक्ष संदेश पुनरुत्पादित केला जाऊ शकत नाही. सर्व वितरित न झालेले संदेश एन्क्रिप्टेड स्वरूपात केवळ मर्यादित कालावधीसाठी साठवले जातात.
Awareness Of 7 Secrets Of Success | यशाचे 7 मुलमंत्र
कोणत्याही गैरवापराची तक्रार झाल्यास गैरवापराचा उगम शोधण्याची संदेस (Sandes) ॲपमध्ये क्षमता आहे. त्यामुळे शासकीय कामकाजासाठी इतर कोणत्याही ॲपचा वापर न करता “संदेस” या NIC ने तयार केलेल्या ॲपचा वापर करणे बंधनकारक करण्याबाबतचे परिपत्रक निर्गमित करणे विचाराधीन होते.
– शासन परिपत्रक-
संदेस (Sandes) ॲप हे इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मची सर्व सुविधा प्रदान करते.
Sandes ॲपची शासकीय वापरासाठी अधिक उपयुक्त ठरतील अशी वैशिष्ट्ये :
- संदेश सुरक्षितपणे पाठवणे व प्राप्त करणे, सुरक्षित साठवण, ओटीपी पाठवणे व वितरितन झालेला Data सुरक्षित ठेवणे.
- शासन/शासकीय कार्यालये यांच्या गरजेनुसार अनुकूलित (Customization) करण्याची सुविधा.
- एनक्रिप्टेड मेसेज आणि फाइल्स पाठवण्यासाठी eGov Application सह सेवा आधारित एकीकरण.
- अनौपचारिक आणि अधिकृत गट तयार करण्याची सुविधा.
- SMS च्या ऐवजी ओटीपी, Alert, सूचना व प्रसारण करणारी संदेस ही सुरक्षित व विनाशुल्क प्रणाली आहे.
- सत्यापित आणि सार्वजनिक वापरकर्त्यांमधील पृथक्करण.
- संदेस पोर्टलद्वारे शासकीय वापरकर्त्यांच्या पडताळणीचा पर्याय.
- संस्थेच्या स्तरावर प्रोफाइल तपशिलांची दृश्यमानता लपविण्याची सुविधा.
- शासनासाठी योग्य जिमोजी (शासकीय इमोजी) आणि टॅगसह डिझाइन केलेले संवाद.
- डेस्कटॉप/लॅपटॉपसाठी संदेस वेब आवृत्तीची उपलब्धता. (sandes.gov.in)
- संदेस पोर्टलवरून संस्थेतील विशिष्ट वापरकर्त्यांसाठी संदेश प्रसारणाची सुविधा.
- पोर्टलवरून भूमिका आधारित व्यवस्थापन आणि देखरेख.
- eGov अॅप्लिकेशन्समधून मेसेज आणि फाइल्स पाठवण्यास साहाय्य करते.
- ॲप्लिकेशन मधून पाठवलेले संदेश आणि ते वाचल्याची पावती प्राप्त झाल्याची सुविधा प्रदान करते.
- १५. एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड ऑडिओ/व्हिडिओ कॉल्स (एकाबरोबर एक आणि सामाईक)
- १६. एकात्मिक बाह्य अनुप्रयोगाद्वारे गट व्यवस्थापनाची सुविधा प्रदान करते.
NIC द्वारे विकसित करण्यात आलेल्या “संदेस” (Sandes) ॲपचा वापर केंद्र शासनातील सर्व अधिकारी/ कर्मचारी तसेच विविध राज्य शासनांमधील 200 हून अधिक शासकीय संस्था यांच्याकडून तसेच 350 हून अधिक ई-गव्हर्नन्स Application मध्ये संदेश, सूचना व ओ.टी.पी. पाठविण्यासाठी केला जात आहे.
सदर ॲपचे विविधांगी कार्य तसेच उपयोग विचारात घेता, महाराष्ट्र राज्य शासनामार्फतदेखील शासकीय कामकाजात राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (NIC) द्वारे विकसित करण्यात आलेल्या “संदेस” (Sandes) ॲपचा वापर करण्याबाबत सर्व विभाग व त्यांच्या अधीनस्थ शासकीय कार्यालयांना सूचना देण्यात येत आहेत. यासाठी शासकीय विभागांनी/कार्यालयांनी करावयाच्या बाबी खालीलप्रमाणे आहेत-
1) sandes.gov.in/download या संकेतस्थळावर जाऊन organisation onboarding फॉर्मडाऊनलोड करून त्यावरील माहिती व्यवस्थित भरावी.
2) सदर फॉर्मची Document copy आणि Scanned copy, hod.sandes_mhsc@nic.in या ई-मेलवर सक्षम प्राधिका-यांच्या शासकीय ई-मेलवरून पाठविण्यात यावी.
3) सदर सूचना या आदेशाच्या दिनांकापासून त्वरित अमलात येतील.
4) सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यातआले असून त्याचा संगणक संकेतांक 202407261620226807 असा आहे. हे आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहेत.
How to Download Sandesh app?
Step : 1 Go to Play Store
Step : 2 Type Sandes app In browser
Step : 3 Install It
OR
Sandes ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला टच करा व डाऊनलोड करा sandes ॲप
This article On Zpshikshak Site was written by Mustapha Shaikh. He is a famous YouTuber and Blogger. He has experience in SEO, web development, and writing SEO content.